पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने आधी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रीय ध्वज फडकवून दाखवावा, असे आव्हान फारुख अब्दुल्ला यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर अमू यांनी अब्दुल्ला यांना थेट धमकीच दिली. तत्पूर्वी, अमू यांनी हरयाणा भाजपच्या माध्यम समन्वयक पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर टीका केली.अमू यांनी नंतर फारूख अब्दुल्ला यांच्यावर निशाणा साधला. अब्दुल्ला हे गेल्या काही दिवसांपासून पाक व्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर संबंधी वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. काश्मीरमधील लाल चौकात अब्दुल्लांच्या कानशिलात लगावण्याची धमकीच त्यांनी दिली. त्यांच्या कानशिलात लावायचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी अब्दुल्लांनी लाल चौकात यावे, आव्हानही त्यांनी दिले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews